उपक्रमशील शिक्षिका मीना भंडे – भोजने यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

चाकूर : 27 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
तालुक्यातील गांजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक पदवीधर तथा उपक्रमशील शिक्षिका मीना भंडे – भोजने यांना मानव विकास संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे . शैक्षणिक , सामाजिक व राष्ट्रीय कार्यातील योगदानाबद्दल मानव विकास संस्थेचे अध्यक्ष वसंत घोगरे- पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण मार्च महिन्यात लातूर येथे होणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले,माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून श्री क्षेत्र काशी (वाराणसी )येथील जगद्गुरू शंकरचार्य श्री.श्री श्री.1008 डाॅ.चंद्रशेखर महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चाकूरचे गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे , विस्तार अधिकारी डॉ. एम. जे. पटेल , केंद्रप्रमुख डी. एन.यादव , केंद्रिय मुख्याध्यापक माधव बेल्लेवाड , मुख्याध्यापक प्रल्हाद इगे, बाळू कासले, भरत पुरी, प्रभावती फड , पौर्णिमा तरकसे, शुभांगी अक्कानवरु, सुनंदा माळी, मंगल बिराजदार, विमल मुदाळे, कविता सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर व चाकूर, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार लातूर, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर, चाकूर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भंडे यांचे अभिनंदन केले आहे.


