उद्या शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाची कार्यशाळा

चाकूर : 29 जुलै / मधुकर कांबळे
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद (समाजशास्त्र विभाग )यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने समाजशास्त्र विषयाची नवीन अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळा उद्या मंगळवार दि.30 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन अहमदपूर चाकूर तालुक्याचे आमदार तथा बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. एन. मोरे यांचे बीजभाषण होणार असून या उदघाटन कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके,समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. घायाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. आर. एम. भिसे, डॉ. बी. डी. पवार, डॉ.एस. आर.गोरे,डॉ. बी.एम. कांबळे डॉ.पी.आर. मुट्ठे, डॉ.अनिल जायभाये, तर द्वितीय सत्रात डॉ.एस. जी.चव्हाण, डॉ.डी.एस. चव्हाण, डॉ. बी. जी.जाधव, डॉ.डी. के. सोनटक्के, डॉ.ए.टी. शिंदे,डॉ. ए.आर.हुरगुळे,डॉ. ए.आर.मुसळे उपस्थितांशी मार्गदर्शनपर संवाद साधणार आहेत.
तर सायंकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचा समारोप करण्यात येणार असून यावेळी माजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. घायाळ, उदयगिरी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र पदव्यूत्तर विभाग प्रमुख डॉ. शफिका अन्सारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत विद्यापीठ अंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्यातील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक सहभागी होणार असून या कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त महाविद्यालयाने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यशाळेचे संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप माने व प्रा. डॉ. नारायण कांबळे यांनी केले आहे.


