चाकूर येथील नाला सरळीकरण कामास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची भेट

चाकूर : 17 मे / मधुकर कांबळे
चाकूर येथील नाला सरळीकरण कामास लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची भेट देऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले.
मृदा व जलसंधारण विभाग लातूर यांच्या माध्यमातून चाकूर नगरपंचायत क्षेत्रातील चाकूर सावरगाव रस्त्यावरील नाला सरळीकरणाचे काम सध्या चालू असून आज शुक्रवार दि.17 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, तहसीलदार नरसिंग जाधव, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी जे.बी. पटेल,तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड, मुख्याधिकारी अजय नरळे, जलसंधारण अधिकारी विशाल कराड, मंडळ अधिकारी एन. के. गायकवाड, तलाठी अविनाश पवार, मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदाडे, कृषी पर्यवेक्षक संतोष पाटील व बालाजी घोडके, नगरपंचायतचे कर निरीक्षक बालाजी स्वामी, पाणी पुरवठा अभियंता बी. व्ही. बेळकर,प्रशांत झांबरे,नाला सरळीकरण कामाचे गुत्तेदार निलेश मद्रेवार, कृषी सहाय्यक विनोद सूर्यवंशी,ॲड. श्रीधर सोनटक्के,पपन कांबळे, राजेश्वर इंद्राळे यांच्या समवेत शेतकरी उपस्थित होते.
बांबू लागवडी सह शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्धजन्य पशु धनाचा जोड व्यवसाय करावा – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नाळा सरळीकरण मार्फत झालेल्या कामाच्या ठिकाणी बांबू वृक्ष लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. शेतकऱ्यांनी सोयाबीन या पारंपरिक पिकासोबतच सोयाबीन व तुर असे मिश्र पिकांची लागवड करावी, तसेच नाला सरळीकरण कामामुळे पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्यामुळे फळबाग लावगड करण्यास सुरुवात करावी. शेती सोबतच दुग्धजन्य पशु धनाची संख्या वाढवून शेतकरी बांधवांनी शेतीसोबतच इतर जोड धंदे करण्याकडे आपला कल वाढवावा असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.


