संविधानातील प्रत्येक कलम कोहिनूर हिऱ्यासारखे – प्रा.वैजनाथ सुरनर यांचे प्रतिपादन

चाकूर : 27 जानेवारी / मधुकर कांबळे
जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताचे आहे.भारतीय संविधान हे अतिशय महत्त्वाचे असून तो देशाचा मुलगामी कायदा आहे. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले असून एवढ्या मोठ्या देशात अनेक जाती, धर्म पंथ असताना सुद्धा संविधानाने सर्व घटकांना समान न्याय दिला आहे. म्हणून संविधानातील एक एक कलम म्हणजे कोहिनूर हिऱ्यासारखे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वैजनाथ सुरनर यांनी केले.
तालुक्यातील हाळी खुर्द येथे साकेत बुद्ध विहारच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा .सुरनर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन जलील पटेल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.भिमराव साळवे,उपसरपंच रमेश शिंदे,ग्रा.पं.सदस्य हैदरसाब सय्यद,ललिता भोसले,प्रयागबाई नरहरे, नागनाथ बेंडके, अशोक वाडकर, माधव भेटे उपस्थित होते.यावेळी प्रा.भिमराव साळवे यांचेही समोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हावगीराज जणगावे यांनी केले तर आभार उपसरपंच रमेश शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल सुर्यवंशी,ज्योती सुर्यवंशी,शितल शिंदे,करुणा कांबळे,,निलेश शिंदे, दिलीप शिंदे ,वामन भालेराव, धोंडीराम भालेराव आदींनी पुढाकार घेतला.


