आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूर तालुक्यात 2 हजार 254 विद्यार्थ्यांनी दिली बारावीच्या इंग्रजीची परीक्षा

बारावी बोर्ड परीक्षेस प्रारंभ,सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात

चाकूर : 12 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर बारावीच्या 2 हजार 254 विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली असून 68 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी /मार्च 2025 मधील बारावीच्या परीक्षेस मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला असून चाकूर तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर 2 हजार 254 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तालुक्यातील सर्व केंद्रावर परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडली.कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉफी सारखा गैरप्रकार प्रकार घडला नाही.
तालुक्यात भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर (परीक्षार्थी 458 , केंद्र संचालक प्रा. आर. एस. गुट्टे ),संजीवनी महाविद्यालय चापोली (परीक्षार्थी 881, केंद्रसंचालक प्रा. बी. एस. बचाटे ), संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय चापोली (परीक्षार्थी 256, केंद्रसंचालक प्रा. व्ही. डी. चापोलीकर ), महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय कबनसांगवी (परीक्षार्थी 250, केंद्रसंचालक प्रा. पी. एन. बिरादार ), शिवजागृती महाविद्यालय नळेगाव (परीक्षार्थी 253, केंद्रसंचालक,प्रा. डी. एच. चामे), कै. राजमाने आश्रम कनिष्ठ महाविद्यालय जानवळ (परीक्षार्थी 224, केंद्रसंचालक प्रा. डी. एच. केंद्रे ) हे सहा परीक्षा केंद्र आहेत.
परीक्षेतील गैर प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी परीक्षा मंडळाच्यावतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात बैठे पथकासह शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे पेपर संपेपर्यंत परीक्षा केंद्रावर होत्या. चापोली येथील संजीवनी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, लातूर विभागाचे सहाय्यक संचालक दत्तात्रय मठपती, तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी भेट दिली. तसेच कबनसांगवी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास चाकूर तालुक्याचे परीरक्षक गोपाळ एनकफाळे यांनी भेट दिली.
चाकूर येथील परीक्षा केंद्रावर महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्र संचालक प्रा. आर. एस. गुट्टे,प्रा. राजेश विभुते, प्रा. मगदूम बिदरे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे, सचिव सिद्धेश्वर पवार, मधुकर कांबळे, शरद किणीकर आदी उपस्थित होते.
परीक्षेसाठी चाकूर येथील जगत जागृती विद्यालयात परिरक्षक कार्यालय उभारण्यात आले असून परिरक्षक म्हणून वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ एनकफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एनकफळे यांच्या नेतृत्वाखाली एम.यु.शेख,एम.एम.कांबळे,के.व्ही. झांबरे,एस.आर.म्हेत्रे,एस.जे.शेख,बी.पी. गगनबोने,यु.ए.शेख,आर.पी.शेळके,आर.बी.माने हे सहपरिरक्षक(रनर)म्हणून काम करीत आहेत.
परीक्षे दरम्यान सहाही परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.चाकूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रास भेट दिली.

केंद्र संचालकांना दररोज द्यावे लागणार सी. सी. टी. व्ही. फुटेज
==================
या वर्षापासून नव्यानेच फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावरील गैर प्रकार रोखणे व कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून परीक्षा कालावधीतील म्हणजेचे पेपर सुरु झाल्यापासून ते पेपर संपेपर्यंतचे सर्व वर्ग खोल्याचे व परीक्षा परिसराचे सी. सी. टी. व्ही. फुटेज त्याच दिवशी केंद्र संचालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.हे फुटेज तपासणी करिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??