चाकूरात हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

चाकूर : 2 जुलै (मधुकर कांबळे )
चाकूर येथे बंजारा समाजाच्यावतीने महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
चाकूर येथील वसंतराव नाईक चौकामध्ये भाई किशनराव देशमुख महाविद्यालयातील प्रा.डॉ.बी.डी पवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी
प्रा.डॉ.बी.डी पवार,पत्रकार सुनिल जाधव,ॲड.परशुराम राठोड,व्ही.एस पॅंथरचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास तानाजी जाधव,ॲड.परशुराम राठोड,सुनिल राठोड,बालाजी जाधव,नितीन जाधव,शत्रुघ्न जाधव,आकाश राठोड, रामराव जाधव,लक्ष्मण पवार,राम जाधव,वैभव राठोड,आकाश राठोड,करण राठोड,अर्जुन.राठोड,राजू राठोड,श्रीकांत राठोड,अर्जुन शेषेराव राठोड,किरण पवार,ईश्वर जाधव,आकाश उद्धव राठोड,दिपक राठोड,भानुदास जाधव,अमोल राठोड यांच्यासह चाकूर तालुक्यातील बंजारा समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचलन संतोष जाधव यांनी तर आभार प्रदर्शन परशुराम राठोड यांनी केले.


