छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंनिसच्यावतीने समता रॅली व अभिवादन

चाकूर :28जून (मधुकर कांबळे)
आरक्षणाचे जनक, समतेचे पाईक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकूर शाखेच्यावतीने समता रॅली काढण्यात आली तसेच शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
सदरील समता रॅली साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शाहू महाराज चौकात शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अंनिसचे माजी अध्यक्ष मधुकर कांबळे, कार्याध्यक्ष धनराज सूर्यवंशी, प्रधान सचिव प्रा.शिवाजी खिराडे, सेवानिवृत्त प्राचार्य लिंबराज केसाळे, नंदकुमार पाटील,मुख्याध्यापक भगवान खडके,सुशील वाघमारे,कृष्णा शिंगरूपे, सूर्यकांत भिसे, गोपीनाथ कांबळे, शिवाजी शेवाळे, संतोष पाटील, रणजित घुमे,लहूजी जाधव, बाळासाहेब धुपे, धनाजी चंबुले, धोंडीराम कदम, प्रशांत गायकवाड, ओम सूर्यवंशी, महेंद्र मोठेराव यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.


