आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृह उपयुक्त ठरणार – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

30 कोटी रुपयेच्या दोन शासकीय वसतीगृहाचे ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

चाकूर : 10 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
तालुक्यातील हणमंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अनेक शासकीय सुविधा उपलब्ध होणार असून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे वसतिगृह अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर तालुक्यातील हणमंतवाडी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मुलामुलींसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उभारण्यात येणाऱ्या 30 कोटी रुपयेच्या दोन शासकीय वसतीगृहाचे भूमिपूजन सहकार मंत्री ना . बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते बुधवार दि.10 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले . त्याप्रसंगी ना.पाटील उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकरराव पाटील, चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने, कार्यकारी अभियंता अलका डाके , उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे,चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,राहुल सुरवसे, नगरसेवक मिलिंद महालिंगे, विलासराव पाटील, भागवत फुले,मुजमिल सय्यद, नितीन रेड्डी,भाजप तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे,माजी सरपंच किशन रेड्डी, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,गोविंदराव भोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अर्जुन मद्रेवार, तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, निसार देशमुख,माजी नगरसेवक इलियास सय्यद, शिवदर्शन स्वामी, महंमद सय्यद, राम कसबे, संजय पाटील, पपन कांबळे, नरसिंग गोलावार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप शेटे, तालुका उपाध्यक्ष गणपत नितळे, गणपत कवठे, सिद्धेश्वर लोहारे, सिद्धेश्वर अंकलकोटे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके, चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, तालुका कार्याध्यक्ष विवेक शिंदे, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर नवगण, ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील, मच्छिंद्र नागरगोजे, निलेश भंडे, अंतेश्वर पाटील, भागवत कुसंगे, महेश व्हते, बाबूभाई दापकेवाले, समाधान डोंगरे, मन्मथ पालापुरे, बिलाल पठाण, प्रदीप पाटील गोळेगावकर, मनोज पाटील, युवराज हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले की, चाकूर येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह व्हावे ही जनमाणसांची भावना होती. 2009 पासून यासाठी माझा प्रयत्न होता मात्र जागेसाठी काही तांत्रिक अडचणीमुळे याला विलंब झाला.हणमंतवाडी येथे जागा उपलब्ध झाल्यानंतर या शासकीय वसतीगृहाचा भूमिपूजन सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतो आहे. या वसतीगृहाचे काम दर्जेदार होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्व सोयीयुक्त हे वसतिगृह उभारले जाणार आहे.
भौतिक सुविधेबरोबर शिक्षण महत्त्वाचे असून,शिक्षणामुळे देशाची प्रगती होऊ शकते.असे सांगून ना. पाटील म्हणाले की मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.चाकूर तालुक्यात येणाऱ्या काळात दूध डेअरी आणणार असून दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नामदार पाटील म्हणाले. चाकूर तालुक्यातील पाणंद रस्त्यासाठी प्रयत्न सुरु असून चाकूर तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावून चाकूर तालुक्यात विकासाचा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सहकार मंत्री ना.पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अलका डाके यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद महालिंगे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाळ माने, भाजपचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, नगरसेवक विलासराव पाटील चाकूरकर यांची समयोचित भाषणे झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बिलाल पठाण यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच हणमंत नरवटे, उपसरपंच राजकुमार शेटे यांच्यासह मनोज नरवटे, निवृत्ती नरवटे, प्रभाकर नरवटे, परमेश्वर पाटील, शंकर पाटील, माधव नरवटे, रमाकांत नरवटे, मारुती नरवटे, लक्ष्मण चव्हाण, दिगंबर किसवे, बजरंग नरवटे, संग्राम नरवटे, नामदेव नरवटे, समाधान जाधव, अण्णाराव नरवटे, लक्ष्मण जाधव, संदीप गुळवे, नागेश नरवटे, मारुती हावडे , जेतालाल जाधव, गोविंद जाधव, तुकाराम नरवटे, ईश्वर गुळवे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास चाकूर तालुक्यातील विविध गावाचे सरपंच,नागरिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??