चाकूर तालुक्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत इनकमिंग वाढू लागली , झरी येथील कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश

चाकूर : 24 जुलै /मधुकर कांबळे
चाकूर-अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकूर तालुक्यातील झरी (बु.)येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात झरी (बु ), येणगेवाडी, गणेश नगर तांडा, खुर्दळी, हणमंत जवळगा, वाघोली, बेलगाव, हडोळी, जढाळा व नायगाव गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी काल मंगळवर दि.23 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.त्यामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक भक्कम होण्यास मदत होणार असून निवडणूकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश महत्वपूर्ण ठरणारा आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहेत. त्यामुळे चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रसंगी पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत व अभिनंदन आ. पाटील यांनी करून आगामी काळात पक्ष कार्यासाठी सर्वाना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाकूर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य पदमाकर पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बालाजी सुर्यवंशी, माजी जि. प. सदस्य दयानंद सुरवसे, माजी उपसभापती तुकाराम पाटील, माजी सरपंच बालाजी मेनचक्रे, युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव, प्रा. डॉ.बी. डी. पवार, झरी (खु)चे सरपंच युवराज सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य नारायण काचे, झरी( खु.)चे सरपंच गणेश सुर्यवंशी पाटील, युवा नेते मनोज पाटील, शैलेश कदम जढाळाचे सरपंच परमेश्वर जांबळदरे, नायगावचे सरपंच ॲड. श्रीनाथ सावंत, पांडुरंग धडे, नितीन पाटील, लहू सुरवसे, स्वराज सुरवसे, धनराज धुमाळ, दिलीप पाटील, सुनील सुर्यवंशी, विवेकानंद शिंदे, अमोल सुर्यवंशी, माऊली कासले, माऊली जाधव, चाकूर युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, केशव सोनवणे आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सचिन तोरे, आदित्य लवटे, केशव सोनवणे आदिसह अनेकजण उपस्थित होते.
नांदगाव व मोहदळच्या सरपंचाचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
================================
चाकूर अहमदपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदगावचे सरपंच योगेश सोळुंके पाटील व मोहदळचे सरपंच शिवदीप निकम यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काल मंगळवारी जाहीर प्रवेश केला आहे.
शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास्थानी नांदगावचे सरपंच सोळुंके पाटील व मोहदळचे सरपंच निकम यांच्या सह शंकर नंदवे, हिरामण शिंदे, बापू शेळके, संदीप भंडे, शेषेराव वाकडे, शंकरराव सोळंके, गजानन सोळंके, माधवराव सोळंके,लक्ष्मणराव शिंदे, यांच्यासह अनेक युवकांनी आ.पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.


