आ. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घरणी व शिवणखेड येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चाकूर : 26 जुलै /मधुकर कांबळे
अहमदपूर चाकूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाकूर तालुक्यातील घरणी व शिवणखेड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार दि.26 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
आ. पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास्थानी झालेल्या पक्ष प्रवेशात शिवणखेड येथील तानाजी गोजेवाड, केशव शिंदे, महेश उगिले, विजयकुमार मोरे, अन्वर शेख, रशीद शेख, विठ्ठल चामलवाड, दीपक नवबद्दे, महादेव काळे, मारुती कदम, ऋषिकेश शालिमे, अजिम ढोले, अनिल शिंदे, लखन लादेवाड तर घरणी येथील राजाराम देशमुख, गोविंद फूडकरेझ शिवलिंगआप्पा स्वामी, प्रल्हाद बुचळे, सोपान शिंदे, दिलीप पाटील, हेमंत पाटील, दीपक पोटे, हनुमंत जाधव, दस्तगीर शेख, अलीम शेख, तरबेज पटेल, विवेक शिंदे, भरत खटके, महादू येंचेवाड, सुदाम शिंदे, कलीम शेख, अब्दुल शेख, बाबुराव मुंगे, प्रमोद पंगे, अच्युत पाटील, अमीर शेख, तुकाराम तोरे, मयूर शिंदे, दगडू शिंदे, कार्तिक कुंभार, उमेश पाटील, माधवआप्पा स्वामी, सचिन शिंदे, अविनाश शिंदे, अक्षय शिंदे, संभाजी शिंदे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. आ. पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव, राष्ट्रवादीचे नेते अनिल वाडकर,तालुका उपाध्यक्ष हणमंत लवटे, नांदगावचे सरपंच योगेश सोळुंके, माजी सरपंच इस्माईल पठाण, मनोज पाटील, संदीप शेटे,संजय कुंभार, सचिन तोरे, अनिल शिंदे उपस्थित होते.
काही दिवसापूवी लातूर रोड येथील ग्रा.प. सदस्य शिवाजी साळी यांनी शरद पवार गटातून तर घरणी येथील दिपक पोटे यांनी बीआरएस पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.


