भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात 21 रक्तदात्यांनी केले रक्तदान
जागतिक महिला दिना निमित्ताने माजी विद्यार्थी संघ , राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

चाकूर : 13 मार्च /मधुकर कांबळे
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात जागतिक महिला दिना निमित्ताने माजी विद्यार्थी संघ , राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.12 मार्च 2025 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उदघाटन चाकूर नगरपंचायतीच्या कर निर्धारण अधिकारी योगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे होते.यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे,उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळे,सचिव सिध्देश्वर पवार,कोषाध्यक्ष मधुकर कांबळे,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.नामदेव गौंड ,महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा.मंगल माळवदकर,प्रा.बबिता मानखेडकर,प्रा. राजेश विभुते यांची उपस्थिती होती. पत्रकार प्रशांत शेटे यांच्यासह मयुरी आलट ,समीर पठाण,रजत भोळे,वसिमा शेख ,वैभव कुंभार,श्रीमंत वाघमारे,प्रा.मंगल माळवदकर,प्रा. माधवी धडे,प्रा.डॉ. सुरेखा खडके,अनिकेत सांगवे,संकेत चामले,हर्षवर्धन पल्ले,सादिक सय्यद, आदित्य कांबळे, धम्मदिप तिकटे,किरण जाधव,सचिन जाधव,अभिजीत पाटील,प्रशांत साळी,बालाजी जाधव यांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन रक्तदान केले.
रक्तदान शिबीरासाठी भालचंद्र ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी दिगांबर पवार,संतोष पाटील,अरुण कसबे,सुरेखा हजारे,नितीन क्षिरसागर,राजकुमार गायकवाड,अन्सर शेख यांच्यासह प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार,प्रा.डॉ.भानुदास पवार ,प्रा.डॉ. प्रकर्ष देशमुख,प्रा.डॉ जनार्दन वाघमारे,प्रा.डॉ. श्याम जाधव,प्रा.डॉ मगदुम बिदरे,प्रा.डॉ.राजु जाधव,आकाश पाडूळे,दत्ता कोकरे, एकनाथ भोसले,सिध्देश्वर स्वामी,अश्फाक शेख, हिरामण राठोड यांनी पुढाकार घेतला .


