उद्या सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 50 कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे भूमिपूजन.
शेळगाव फाटा व नळेगाव येथे होणार भूमिपूजन कार्यक्रम

चाकूर : 22 जून /मधुकर कांबळे
राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्रीय मार्ग निधी या योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 50 कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे भूमिपूजन सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्या सोमवार दि.23 जून 2025 रोजी करण्यात येणार आहे.

यामध्ये हाळी ते डोंग्रज 10 किलोमीटर लांबीच्या 25 कोटी रुपयांच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी 10.00 शेळगाव फाटा येथे तर घरणी ते नळेगाव व हुडगेवाडी या 10 किलोमीटर रस्त्याचा 25 कोटी रुपयाच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी 11.30 वा.ना.पाटील यांच्या शुभहस्ते नळेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
शेळगाव फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे राहणार असून नळेगाव येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सूर्यकांत चव्हाण राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकरराव पाटील,चाकूरचे नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, रमाकांत चवळे, उत्तमराव पाटील,निर्मलाताई वाडकर, बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव,युवक तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक राहुल सुरवसे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंढे,दयानंद सुरवसे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,गंगाधरअप्पा अक्कानवरू,राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे,नळेगावचे चेअरमन शेषेराव मुंजाने,माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणपत नितळे,सावता माळी,गणपत कवठे,राष्ट्रवादीचे चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे,युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण,नगरसेवक मुज्जमिल सय्यद,इलियास सय्यद,शिवदर्शन स्वामी,राम कसबे,विष्णू तिकटे,लक्ष्मण घुमे, व्यंकट केलवाड, विश्वनाथ एडके, मेघराज पाटील, समाधान डोंगरे, राजाराम महात्मे, सूर्यकांत केंद्रे, प्रकाश बंडे, गणपतराव मुंडे,सुभाष चापुले, बाळासाहेब पाटील,मारुती माडगे, ओम केंद्रे,संदीप शेटे, विश्वनाथ घटकार,राजकुमार वागलगावे, राजाराम चिंचोळे, गणेश पाटील, प्रफुल्ल चवळे, सचिन बदनाळे, संगमेश्वर वाडकर, सतीश पाटील, योगेश वाडकर,शरद पाटील,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बी.एम. बिराजदार,महाळंग्राचे सरपंच मार्शल माने,नळेगावच्या उपसरपंच पदमीनबाई खांडेकर,सुगावचे उपसरपंच हरिभाऊ काळे , हणमंतराव लवटे पाटील, खुदबुद्दीन घोरवाडे, सूर्यकांत सावंत, सोपानराव मनाळे, श्रीराम गायकवाड,नामदेव शिंगडे , शंकरराव पाटील, विश्वनाथ एडके, व्यंकटराव पाटील,सुरेंद्र सावंत, सर्फराज घोरवाडे, इर्शाद मुजावर, गणेश शिंदाळकर, उमाकांत सावंत, आली मुनबी मजकुरी, अशपाक मुजावर, रवी शिरुरे, जनाबाई सुरवसे, नागनाथ भालेकर,सतीश पांडे,मुजमिल पटवेकर, कलुबाई तोंडारे, धोंडीराम रामपुरे, संजिदाबी कोतवाल, श्याम मुंजाने, रामकृष्ण शिरूरे, पंडित मोरकांडे, भिमाजी धामणगावकर, कावेरी गाडेकर, जनाबाई शिरूरे, रामेश्वर बिराजदार, नरसिंग पाटील,गोपाळकृष्ण मोकाशे, तानाजी शिंदाळकर,चंद्रकांत शेलार, बळवंतराव पाटील सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


