विकास कामाच्या माध्यमातून मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार – सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील
शेळगाव फाटा व नळेगाव येथे 50 कोटी रुपये रस्ते कामाचे ना. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

चाकूर : 23 जून/(मधुकर कांबळे)
मतदार संघाच्या विकास कामासाठी मी कट्टीबद्ध असून विकास कामाच्या माध्यमातून चाकूर अहमदपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. तसेच जिल्ह्यात पक्क्या रस्त्याचे जाळे विणुन अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाला सुजलाम सुफलाम बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी केले.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ना.बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने शेळगाव ते डोंग्रज येथे 25 कोटी रुपये व नळेगाव येथे 25 कोटी अशा एकूण 50 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी ना. पाटील बोलत होते. शेळगाव येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे होते तर नळेगाव येथे सरपंच सूर्यकांत चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील,चाकूरचे नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,शिरूरचे उपसरपंच सुरज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे,अधीक्षक अभियंता अल्का डाके,बी. आर. आंदे, कृष्णा पाटील,रमाकांत चवळे, उत्तम पाटील,निर्मला वाडकर, बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,युवक तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक राहुल सुरवसे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंढे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,गंगाधरअप्पा अक्कानवरू,राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे,माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल वाडकर,गणपत नितळे,गणपत कवठे,नगरसेवक मुज्जमिल सय्यद, इलियास सय्यद, रामेश्वर कसबे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके,सांडोळ महांडोळचे सरपंच प्रकाश बंडे,बोथीचे चेअरमन सूर्यकांत केंद्रे,लक्ष्मण घुमे, व्यंकट केलवाड, राष्ट्रवादीचे चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण,संदीप शेटे,मेघराज पाटील, समाधान डोंगरे, बळीराम भोसले,राजाराम महात्मे, गणपत मुंडे,सुभाष चापुले, बाळासाहेब पाटील,विश्वनाथ घटकार,राजकुमार वागलगावे, राजाराम चिंचोळे, गणेश पाटील, प्रफुल्ल चवळे, सचिन बदनाळे, संगमेश्वर वाडकर, सतीश पाटील उपस्थित होते.
तर नळेगाव येथील कार्यक्रमास चेअरमन शेषेराव मुंजाने,बी.एम. बिराजदार, पद्मिन खांडेकर,हणमंत लवटेb, सावता माळी, खुदबुद्दीन घोरवाडे, सूर्यकांत सावंत, सोपान मनाळे, मार्शल माने, श्रीराम गायकवाड,नामदेव शिंगडे , शंकर पाटील, व्यंकट पाटील,सुरेंद्र सावंत, सर्फराज घोरवाडे, इर्शाद मुजावर, गणेश शिंदाळकर, उमाकांत सावंत, अलीमुनबी मजकुरी, अशपाक मुजावर, रवी शिरुरे, जनाबाई सुरवसे, नागनाथ भालेकर,सतीश पांडे,मुजमिल पटवेकर, कलुबाई तोंडारे, धोंडीराम रामपुरे, संजिदाबी कोतवाल, श्याम मुंजाने, रामकृष्ण शिरूरे, पंडित मोरकांडे, भिमाजी धामणगावकर, कावेरी गाडेकर, जना शिरूरे, रामेश्वर बिराजदार, नरसिंग पाटील,गोपाळकृष्ण मोकाशे, तानाजी शिंदाळकर,चंद्रकांत शेलार, बळवंत पाटील यांच्या सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की मतदारसंघातील रस्त्यासाठी भरीव निधी देणार असून मतदार संघातील रस्त्यांमुळे दळणवळणाला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहकाराशी जोडणार असून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम सहकार खात्याच्या माध्यमातून केले जाईल.आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मला विधानसभेत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली, त्याचबरोबर मराठवाडा व विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अजितदादांनी मला सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.सहकार विभागात 30 कोटी पेक्षा अधिक लोक काम करतात. राज्यातल्या सोसायटीना भरीव निधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याची माझे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जेसाठी शासन भरिव निधी देत असून आपण सर्वांनी सौर ऊर्जा प्रकल्प बसून घ्यावा असे आवाहनही ना. पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. चाकूर तालुक्यात भविष्यात दूध प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. चाकूर तालुक्यातील उर्वरित विकास कामाला गती देऊन लवकरच सर्व विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीरच्या अधीक्षक अभियंता अल्का डाके यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश स्वामी,बिलाल पठाण व रेड्डी यांनी केले.


