बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्याचे लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

चाकूर : 22 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या निकषाप्रमाणे न केलेल्या जिल्ह्यातील नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.
लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की
या निवडी शासकीय ब पत्रकानूसार केलेल्या नाहीत, यातील निकष ज्या संस्थानी व सदस्यांनी पुर्ण केलेले नाहीत, अशाचे अशासकीय सदस्यपद रद्द करून योग्य तो न्याय द्यावा. तसेच ज्यांनी या निकषाची तपासणी केली असेल त्यांनी चुकीची माहिती अध्यक्ष व निवड समितीला दिलेली आहे.अशा संबधितावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या निकषाप्रमाणे न केलेल्या बेकायदेशीर नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात,अशी मागणी करून सोबत महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राची प्रतही माहितीसाठी जोडल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे जिल्हाध्यक्ष संग्राम वाघमारे, महिला प्रदेशाध्यक्ष कांचन मारुती वाघमारे, चाकूर तालुकाध्यक्ष पांडुरंग साळुंके, लातूर तालुकाध्यक्ष विशाल कणसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


