राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त चाकूरात ध्वजारोहण

चाकूर : 10 जून /मधुकर कांबळे
चाकूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त चाकूर येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ध्वजारोहन करण्यात आले.
चाकूर येथील आर. आर. प्रिंटर्स समोर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे यांच्या हस्ते सकाळी 10.10 वा.पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी चाकूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष करिमसाहेब गुळवे,माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,गंगाधरअप्पा अक्कानवरु ,बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव, संचालक तथा तालुका युवकाध्यक्ष राहुल सुरवसे,एमआयडीसीचे चेअरमन करीम डोंगरे,अनिल वाडकर,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके, चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे,जेष्ठ नेते अर्जुन मद्रेवार,नागोराव पाटील, गणपत नितळे, गणपत कवठे अॕड.संतोष गंभीरे ,आबासाहेब बिडवे शिवप्रसाद शेटे, हणमंत लवटे,,प्रा. डॉ. भानुदास पवार,युनूस सय्यद,भुजंग शिंदे, बळीराम पाटील,खुदबोद्दीन घोरवाडे, शैलेश कदम, आय. डी. शेख, सूर्यकांत केंद्रे, बालाजी भोरे, देविदास होळदांडगे,गणेश सिंदाळकर,राजेंद्र करले,काशिम पटेल,मदन रामासाने,नवनाथ आवाळे,चंद्रमणी सिरसाठ,राजाराम महात्मे,विष्णू खेरडे,बाळू कांबळे,अविनाश भोरे यांच्या सह चाकूर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


