आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूर तालुक्यात दर्पण दिन उत्साहात साजरा , विविध ठिकाणी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

चाकूर :7जानेवारी/मधुकर कांबळे
दर्पण दिनानिमित्त चाकूर तालुक्यात विविध ठिकाणी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दर्पण दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
चाकूर येथील सिटी प्रेस क्लब कार्यालयात मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ संपादक अनिल वाडकर व जेष्ठ पत्रकार नागनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आर. के. मित्रमंडळाचे अध्यक्ष राम कसबे उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांनीही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.प्रमुख पाहुणे अनिल वाडकर, नागनाथ पाटील व राम कसबे यांचा सिटी प्रेस क्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवानांही गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास सिटी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. अ. ना. शिंदे, सचिव मधुकर कांबळे, कार्याध्यक्ष संगमेश्वर जनगावे, सतिश गाडेकर,सलीम तांबोळी,सुनिल भोसले,ॲड. बसवेश्वर जनगावे,चेतन होळदांडगे,विजय शिंदे,अलीम शेख आदीजण उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. अ. ना. शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधुकर कांबळे यांनी केले.
चाकूर तालुका व्हाईस ऑफ मिडीयाच्यावतीने पत्रकार व पत्रकारांच्या कुटूंबियांची मोफत आरोग्य तपासणी व पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान.
चाकूर तालुका व्हाईस ऑफ मिडीयाच्यावतीने दर्पण दिनानिमित्त पत्रकार व पत्रकारांच्या कुटूंबियांची मोफत आरोग्य तपासणी व पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिक्षक डॉ. जितेन जैस्वाल हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष कपिल माकणे,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, माजी सभापती तथा नगरसेविका ज्योती स्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक होळे आदिजण उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी चाकूर तालुक्यातील पत्रकार व पत्रकाराच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास 100 जणांची नेत्र तपासणी,शुगर, ब्लड प्रेशर आदीची तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत औषधोपचार करण्यात आले.याच कार्यक्रमात विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष, सदस्य आदिसह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
पत्रकार मित्रमंडळ कार्यालयातही दर्पण दिन साजरा.
पत्रकार मित्रमंडळ कार्यालयातही दर्पण दिन साजरा करण्यात आला.मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नूतन अध्यक्ष संतोष आचवले,सचिव नितीन कुलकर्णी,प्रा,अ ना शिंदे ,संस्थापक अध्यक्ष संदीप अंकलकोटे,निरंजन रेड्डी,ओमप्रकाश लोया, मधुकर कांबळे, सलीम तांबोळी,यादव कर्डिले, वैभव रेकुळगे, बसवराज होनराव, धर्मराज साबदे,विक्रम चाटे,शिवानंद स्वामी आदींची उपस्थिती होती.यावेळी चाकूर तालुका पत्रकार मित्र मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
चाकूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने नळेगाव येथे अभिवादन कार्यक्रम
दर्पण दिनानिमित्त चाकूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने नळेगाव येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नळेगावचे सरपंच सूर्यकांत चव्हाण, सुनील पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवशंकर टाक, सचिव दत्तात्रय मेहकरे, प्रशांत शेटे, विनोद निला, संगमेश्वर जनगावे,संग्राम वाघमारे, साकराप्पा वाघमारे,सदाशिव मोरे,संजय पाटील, सुधाकर हेमनर, माधव वाघ, सतिश गाडेकर, गणेश स्वामी, चेतन होळदांडगे, दीपक पाटील यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??