आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औषधनिर्माणशास्त्र राष्ट्रीय शिक्षण व संशोधन संस्था (NIPER ) परीक्षेत दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश

चाकूर : 22 जून / मधुकर कांबळे
औषधनिर्माणशास्त्र राष्ट्रीय शिक्षण व संशोधन संस्था.( NIPER ) अंतर्गत झालेल्या परीक्षेत महाळंग्रा येथील दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसीमधील जगदीश स्वामी, प्रथमेश कावरे व दत्ता पोळकर या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यामध्ये जगदीश मल्लिकार्जुन स्वामी याने AIR-659, प्रथमेश ज्ञानेश्वर कावरे याने AIR-698 , दत्ता राजेंद्र पोळकर याने AIR-727 रॅंक मिळवून यश संपादन केले आहे.
सदरील परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते.यामधून राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थेत प्रवेश मिळतो तसेच नामांकित स्वरुपाच्या औषधनिर्माण कंपनीत नोकरीची संधी प्राप्त होते.यामुळे स्वामी, कावरे व पोळकर यांना राष्ट्रीय स्तरावरील औषधनिर्माणशास्त्र संशोधन संस्थेत प्रवेश मिळणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणाऱ्या तिन्ही गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन राधेय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश बेंबडे,सचिव प्रणिता बेंबडे,कोषाध्यक्ष विवेक बेंबडे,प्राचार्य डॉ.जयदीप यादव,प्राचार्य डॉ.श्रीकांत ढगे,प्रशासकीय अधिकारी श्रीहरी वेदपाठक व महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??