आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘ त्या ‘ शेतकरी दाम्पत्याला मदत करण्याची सहकारमंत्र्यांची हमी ,मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी फोनवरून साधला शेतकऱ्याशी संवाद

चाकूर : 3 जुलै (मधुकर कांबळे )
अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे दाम्पत्य बैलाऐवजी स्वतःला जुंपून मशागत करत असल्याची बातमी प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध होताच राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी त्या शेतकऱ्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्यावर असलेले कर्ज फेडण्याचे व बी-बियाणांसाठी पैसे देण्याची हमी दिली आहे . यामुळे अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मंत्री म्हणून ना. पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
मागील दोन दिवसांपासून वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे आपल्या शेतात बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेवून मशागत करत असल्याचे दृश्य विविध माध्यमांमधून व्हायरल झाले. ही बातमी समजताच राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी आज थेट त्या शेतकऱ्याला फोन करून त्यांच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती घेतली व ते 40 हजार रूपयांचे कर्ज भरण्याचे आणि त्यांना लागणाऱ्या बी-बियाणे यासाठी मदत करण्याची हमी दिली.
अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या वृद्ध दाम्पत्याकडे 5 एकर कोरडवाहू जमीन आहे.आता वृद्धावस्थेत शेती करणे अवघड झाले आहे. मुलगा पुण्याला कोठेतरी खासगी नोकरी करतो, असे त्यांनी सांगितले. बैल बारदाणा करणे किंवा शेती करणे परवडत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच आमच्यावर असलेले कर्ज भरा व बी-बियाणे यासाठी मदत करा. आमच्या मुलांना नोकरीसाठीही प्रयत्न करा अशीही विनंती ना. पाटील यांच्याकडे केली.क्षणाचाही विलंब न करता ना. पाटील यांनी पवार यांना कर्ज फेडण्याचे व बी-बियाणांसाठी पैसे देण्याची हमी दिली. सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेमुळे राज्यभरात त्यांच्या कार्याची चर्चा सुरु असून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??