खुर्दळी येथील नवसाला पावणारी श्री जनमाता देवी मंदिरात विधिवत घटस्थापना
छबिना मिरवणुकीत गावकरी, भाविक भक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

चाकूर : 2 ऑक्टोबर / मधुकर कांबळे
तालुक्यातील खुर्दळी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या म्हणून सर्वदूर नावलौकिक असणाऱ्या श्री.जनमाता आई मंदिरातील घटस्थापना रूढी,परंपरा, रितीरिवाजानुसार आज बुधवार दि.2 ऑक्टोबर 2024 रोजी कलश यात्रा, आराधी, वाजंत्री यांच्या गजरात,मोठ्या उत्साहात विधिवत पूजा करून मनोभावे करण्यात आली.
घटस्थापणेपूर्वी सजलेल्या पालखीतून देवीची गावामध्ये छबिना मिरवणूक काढण्यात आली.या छबिना मिरवणुकीत समस्त गावकरी,भाविक भक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर घटस्थापना व आरती करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या सुख, समृद्धीसाठी आराध्यांनी गोधळाच्या माध्यमातून देवीला साकडे घातले.
या नेत्रदीपक सोहळ्यास चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार आमदार बाबासाहेब पाटील,माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,माजी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव,सरपंच प्रचिता भोसले,सरपंच दयानंद सुरवसे, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले, माजी सभापती प्रशांत पाटील, बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,नगरसेवक अभिमन्यू धोंडगे, अनिल वाडकर, विलास सुर्यवंशी,गणपत कवठे, प्राचार्य यादव कर्डिले, मनोज शिंदे,जेष्ठ पत्रकार प्रा.अ.ना.शिंदे, विनोद निला, संग्राम वाघमारे, सुधाकर हेमनर, सदाशिव मोरे ,चाकूर येथील केंद्रीय विद्यालयाचे शिवाजी रामपूरकर, बीट जमादार गोविंद बोळंगे, हेड कॉन्स्टेबल रवी वाघमारे, जिल्हा गुप्तचर विभागाचे हणमंत मस्के,सचिन तोरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भाविक भक्त, मानकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त मंडळाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याठिकाणी लातूर येथील चित्रकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती राजेश्वर बेंडके यांनी काढलेली पोर्ट्रेट रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या नवरात्रोत्सवात दि.2 ऑक्टोंबर ते दि.12 ऑक्टोबर 2024 म्हणजेच विजयादशमी या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक व समाजप्रबोधनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


