सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नूतन सभापतीचा सत्कार

चाकूर : 14 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी चाकूर नगर पंचायतीच्या नूतन सभापतीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
काल गुरुवार दि.13 फेब्रुवारी रोजी चाकूर नगरपंचायतीच्या सभापती निवडी झाल्या असून त्यात बांधकाम सभापतीपदी मुज्जमील सय्यद, पाणीपुरवठा सभापती गोदावरी पाटील व महिला व बाल कल्याण सभापती म्हणून शुभांगी कसबे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे या तिन्ही सभापतीचा सत्कार सहकार मंत्री ना.पाटील यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर पंचायतीचे गटनेते करीमसाहेब गुळवे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मिलिंद महालिंगे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक विलासराव पाटील,माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल वाडकर,नगरसेवक भागवत फुले, साईप्रसाद हिप्पाळे, नगरसेविका ज्योती स्वामी, गंगुबाई गोलावर, माजी नगरसेवक इलियास सय्यद,राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, जयहिंद अकॅडमीचे संचालक चंद्रकांत कसबे,संजय पाटील,राम कसबे, नरसिंग गोलावार,विष्णू तिकटे, संदीप शेटे,बाळू कांबळे, सचिन तोरे,आदी सह अनेकजण उपस्थित होते.


