अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज

चाकूर : 31ऑक्टोबर / मधुकर कांबळे
महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा 2024 निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 42 उमेदवारी अर्ज अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वैध ठरले आहेत.
20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात 288 जागेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 होती.त्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यात सहा जागेसाठी 213 उमेदवारांनी 301 उमेदवारी अर्ज दाखल केले. त्या दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी करण्यात आली. त्यात सर्वाधिक 42 जणांचे उमेदवारी अर्ज अहमदपूर विधानसभा मतदार संघात वैध ठरले आहेत. त्यापाठोपाठ लातूर ग्रामीण 37, औसा 36, लातूर शहर 34 तर निलंगा व उदगीर विधानसभा सभा मतदार संघात प्रत्येकी 22 असे एकूण 193 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर 2024 असल्यामुळे निवडणुकीचे खरे चित्र हे 4 नोव्हेंबर पहावयास मिळणार आहे.


