आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती व अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय सानुग्रह अनुदान मंजुरी आदेशांचे वाटप

चाकूर : 12 जून /मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय सानुग्रह अनुदान मंजुरी आदेशांचे वाटप चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील व तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या हस्ते आज बुधवार दि. 12 जून 2024  रोजी तहसील कार्यालयात करण्यात आले.
वीज पडून मयत झालेले महाळंगी गावातील मयत शेतकरी ओमशिवा शिंदे व शिवाजी गोमचाळे यांच्या पत्नीना प्रत्येकी चार लाख रुपयेचे सानुग्रह अनुदान मंजुरीचे आदेश देण्यात आले. तसेच अजनसोंड बु. येथील सुचिता उध्दव पाटील व सुरेखा नंदकुमार टमके तर झरी खु. येथील अंजली धनराज सूर्यवंशी यांना गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीचे प्रत्येकी दोन लाख रुपयाचे मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. वीज पडून शिवणखेड येथील शेतकरी बालाजी प्रभू कोंपले यांची म्हैस, घरणीचे शेतकरी बालाजी नारायण शिंदे यांची गाय, उजळंबचे शेतकरी भरत मल्लिकार्जुन टिपराळे यांची गाय, रोहित नवनाथ टिपराळे यांचे वासरू मयत झाल्याने त्यांनाही शासकीय मदत निधीच्या मंजुरी आदेशांचे वाटप करण्यात आले.तसेच कृषी विभागामार्फत तालुक्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आ. पाटील यांच्या हस्ते बियाणांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार अक्षय म्हेत्रे,तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकरराव पाटील ,अव्वल कारकून अनिल कचरे, मंडळ कृषी अधिकारी संतोष पाटील, कृषी पर्यवेक्षक व्यंकट व्यंजने, बालाजी घोडके, तलाठी अविनाश पवार,विष्णू वजिरे, बालाजी हाक्के, बी बी मजगे, कृषीसहाय्यक सचिन पंडगे, नरसिंग गुंठे,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी दयानंद सुरवसे, अनिल वाडकर,नगरसेवक मुज्जमील सय्यद,माजी नगरसेवक इलियास सय्यद,राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, राम कसबे,सतीश फुलारी, संदीप शेटे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चाकूरचे तलाठी अविनाश पवार यांनी केले.
 
					 
					 
					

