चाकूरात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबीर संपन्न
पतंजलीचा पुढाकार,शासकीय कर्मचाऱ्यांसह शहरातील महिला व पुरुषांनी घेतले योगाचे धडे

चाकूर : 22 जून /मधुकर कांबळे
10 व्या जागतिक योग दिनानिमित्त चाकूरात काल शुक्रवार दि.21 जून 2024 रोजी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये तालुक्यातील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांसह शहरातील महिला व पुरुष बांधवानी योगाचे धडे घेतले.
21 जून जागतिक योग दिनानिमित्त चाकूर येथील श्री विश्वशांतीधाम ओंकारेश्वर मंदिराच्या सभागृहात एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन चाकूर पतंजली योग समिती,तहसील कार्यालय चाकूर ,रोटरी क्लब चाकूर , पोलीस स्टेशन चाकूर व प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या योग शिबिराचे उद्घाटन चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील व चाकूरचे तलाठी अविनाश पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या योग प्रशिक्षणाला पतंजलीचे तालुका प्रभारी ओमप्रकाश लोया, रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ब्रह्माकुमारी ज्योती दीदी ,ज्येष्ठ पत्रकार प्रा.अ. ना. शिंदे, ॲड.संतोष गंभीरे,डॉ.केंद्रे,सुरज सोनटक्के,दिलीप शेटे, सावता डाके,राजिव डिगोळे, बाळू माने,नविन पाटील,नागेश शिंदे,माधव हाळे,रविकिरण स्वामी तेरकर ,सुभाष स्वामी, वसंत भोसले,सुशीलाबाई नागिमे, गोदावरी शेटे, सत्यभामा रेड्डी,राजमती सगरे, कल्पना अक्कानवरू, संगीता हाळे,यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,यावेळी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचलन गुणवंत जानकर यांनी केले तर आभार चंद्रशेखर मुळे यांनी मानले या एक दिवसीय योग शिबिरास शहरातील योग प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी योग्य शिक्षक धनराज गोलावार व सुमन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
तालुक्यातील शाळा महाविद्यालयातही योगा
=====================
जागतिक योग दिनानिमित्त तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातही योग दिन साजरा करण्यात आला असून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी 7 वाजता बहुतांशी सर्वच शाळा महाविद्यालयात योगा करण्यात आला. यामध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. तसेच अनेक ठिकाणी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.


