आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चाकूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. संजय स्वामी तर सचिव पदी सुरेश हाके यांची निवड

चाकूर :30 जून /मधुकर कांबळे
चाकूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. संजय स्वामी यांची तर सचिवपदी सुरेश हाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
चाकूर रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .या बैठकीमध्ये पुढील 24 /25 चे अध्यक्षपदी डॉ. संजय स्वामी, सचिवपदी सुरेश हाके ,उपाध्यक्षपदी डॉ. केदार पाटील तर सहसचिवपदी धनंजय चिताडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.रोटरी 25 /26 चे प्रांतपाल सुधीर लातूरे ,बी.आर. पाटील,उमाकांत मद्रेवार,चाकूर रोटरी क्लबचे सचिव विश्वनाथ एडके ,माजी अध्यक्ष डॉ.एन.जी.मिर्झा,नारायण बेजगमवार,दिलीप शेटे,सागर रेचवाडे,सुधाकर हेमनर,प्रशांत शेटे यावेळी उपस्थित होते.


