केंद्रप्रमुख आजम शेख यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

चाकूर :5 सप्टेंबर /मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील आटोळा व चापोली केंद्राचे केंद्रप्रमुख आजम उस्मानसाब शेख यांचा सेवापुर्ती सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवघाळ येथे संपन्न झाला .
गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे यांच्या हस्ते त्यांचा आटोळा केंद्राच्या वतीने व तिवघाळ शाळेच्या वतीने शाल ,श्रीफळ, पुष्पहार ,भर पेहराव व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. आजम शेख यांनी गांजुरवाडी, लातूर रोड, अंबुलगा,तेलगाव तिवघाळ येथे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट सेवा दिलेली आहे आटोळा व चापोली केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली आहे . सेवानिवृत्ती निमित्त सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व मित्र परिवार यांच्या वतीने आजम शेख यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यास्मिन आजम शेख मोमीन याही एक उपक्रमशील आदर्श शिक्षिका आहेत.
या कार्यक्रमास तिवघाळचे सरपंच अंगद पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामानंद पाटील,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी पाटील,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बाबुराव मुठ्ठे,केंद्रीय मुख्याध्यापक वसंत ढगे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन शरद हुडगे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत भोजने,शिवहार स्वामी,हरिश्चंद्र साठे,केंद्रप्रमुख मुजीब शेख,माधव सोनटक्के,सुभाष केंद्रे,प्रा नसरीन शेख,आफरीन शेख,विरभद्र बावगे,विवेकानंद स्वामी,शिवकुमार मोरगे,शोभा केंद्रे,कमलाकर इंद्राळे,विनायक बिराजदार ओमप्रकाश नागुरे, पुंडलिक हवालदार,श्रीधर म्हेत्रे,शहादत शेख,अयुब शेख आटोळा केंद्रांतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तिवघाळ शाळेचे मुख्याध्यापक माधव नागरगोजे,अंगद कासले , अंकुश कोळी,दुर्गानंद चाटे,प्रेमकला यलकवाड,अंजना मद्देवाड, सुजाता भाईक, आदिंनी पुढाकार घेतला.प्रमोद हुडगे यांनी सुत्रसंचलन केले तर माधव नागरगोजे यांनी आभार मानले,.


