लोकायत शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.रवि देशमुख तर सचिवपदी प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार यांची बिनविरोध निवड

चाकूर : 6 सप्टेंबर /मधुकर कांबळे
अहमदपूर येथील लोकायत शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.रवि देशमुख यांची तर सचिवपदी प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
लोकायत शिक्षक संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेची नुकतीच संचालक मंडळाची 15 जागेसाठी निवडणूक झाली असून यात प्रा.रवि देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच जागेवर विजय मिळविला असल्यामुळे चेअरमन व सचिव यांच्यासह सर्वच निवडी बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
नूतन पदाधिकारी यांच्या निवडीसाठी संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकारी आर.सी.संगई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन यात नूतन चेअरमन म्हणून प्रा. रवी देशमुख, सचिव प्रा. राजेश तगडपल्लेवार,व्हा. चेअरमन हाणमंत कनकुरे तर कोषाध्यक्ष म्हणून आकाश पाडुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडीबदल संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख ,सचिव ॲड.पी.डी.कदम,उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख ,भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .


