आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्या चाकूरात 7 कोटी 60 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

चाकूर : 3 ऑक्टोबर / मधुकर कांबळे
विविध विकास योजने अंतर्गत चाकूर शहरातील विविध प्रभागात उद्या शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 7 कोटी 60 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे.
सकाळी 9 वाजल्यापासून या कार्यक्रमास सुरुवात होणार असून यानिमित्त उद्या आ. पाटील हे दिवसभर चाकूर शहरातील कार्यक्रमात सहभागी राहणार आहेत.
सकाळी 9 वा. लेक्चर कॉलनी,9.15 वा. हसन कुबडे यांच्या घरासमोर, 9.30 वा. लिमरास नगर, 9.45 वा.ॲड.जवादे यांच्या घरासमोर, सकाळी 10 वा.बुलंदभाई नगर,10.15 वा.बालाजी धोंडगे यांच्या घरासमोर,10:30 वा. बाळू लाटे यांच्या घरासमोर, 10.45 वा. विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोर,11वा. शनिमंदिरासमोर,11.15 वा. ईदगाह मस्जिद समोर,11.30 वा. जुनी मस्जिद समोर,11.45 वा. अलाउद्दीन पटेल यांच्या घरासमोर, दुपारी 12 वा. राममंदिर सभागृहासमोर,12.15 वा. बोथीरोड,12.30 वा. बुद्ध विहारासमोर,2.15 वा. एस. बी. आय. बँके समोर,2.30 वा. ओमशांती मंदिरासमोर,2.45 वा. उत्तमराव पाटील डी. पी. समोर,3 वा. मुस्लिम स्मशानभूमी समोर,3.15 वा. सार्वजनिक स्मशानभूमी समोर,3.30 वा. जुनी मुस्लिम स्मशानभूमी समोर,3.45 वा. ओम लोया यांच्या घरासमोर,4 वा. महात्मा बसवेश्वर चौक वाड्याखाली ,4.15 वा.जय भवानी मंदिरासमोर.
या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमास महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


