निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी अहमदपूर येथील स्ट्रॉंग रूमची केली पाहणी

चाकूर : 1 नोव्हेंबर /मधुकर कांबळे
लातूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक ,पोलीस उपमहानिरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी आज शुक्रवार दि.1 नोव्हेंबर रोजी अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या अहमदपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील स्ट्रॉंग रूमला भेट दिली व तेथील सुरक्षेची पाहणी केली.तसेच सुनेगाव- सांगवी तपासणी नाका येथेही भेट दिली.
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक प्रमोद कुमार मंडल (आयपीएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी आज अहमदपूर येथील स्ट्रॉंग रूम व सुनेगाव- सांगवी तपासणी नाका येथे भेट दिली. दोन्ही ठिकाणी सुरक्षिततेबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना प्रमोद कुमार मंडल यांनी दिल्या.


