मुख्याध्यापिका सविता स्वामी यांची निःस्वार्थ भावनेने शिक्षण क्षेत्रात सेवा : आ. विक्रम काळे

चाकूर : 12 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
शाळा व विद्यार्थी यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक व मुख्याध्यापिका म्हणून सविता स्वामी यांचे कार्य आणि योगदान सतत उर्जा देणारे असून त्यांनी 39 वर्ष अविरतपणे निःस्वार्थ भावनेने शिक्षण क्षेत्रात सेवा केली असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
चाकूर येथील जगत जागृती विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सविता मन्मथ स्वामी यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ माझी माय मंगल कार्यालयात संपन्न झाला.त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रविण स्वामी, जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण जंगम,सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय भोसले, मन्मथ स्वामी,अशोक पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अंकुश नाडे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. दयानंद झांबरे, मुरुड डायट येथील तज्ञ साधनव्यक्ती निशिकांत मिरकले आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. काळे म्हणाले की,सविता स्वामी यांनी आपल्या सेवेच्या काळात शिक्षकी पेशात मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थी आणि शाळा हा त्यांचा दिनक्रम राहिला असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगून स्वामी यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी आ. प्रविण स्वामी, श्रावण जंगम यांनी मनोगत व्यक्त करून सविता स्वामी यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सविता स्वामी यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा मन्मथ स्वामी,संचलन वैशाली गोकुळे, शिवकांत स्वामी तर आभार शिवहार स्वामी यांनी मानले.
या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पांचाळ,व्यंकट गुरमे ,विनायक दिवे,यांच्यासह चाकूर व परिसरातील शिक्षण क्षेत्रातील आणि प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर स्वामी, अभियंता गजानन स्वामी,आर बी आय बँक मुंबई व्यवस्थापक योगेश स्वामी,सह शिक्षिका प्रणिता स्वामी आदीनी परिश्रम घेतले.


