चाकूर रोटरी क्लबच्या लेक लाडकी भाग्याची अभियानाचा डॉ. मोतीपवळे यांच्या उपस्थितीत समारोप

चाकूर :29 जून /मधुकर कांबळे
चाकूरात लेक लाडकी भाग्याची या अभियानाचा समारोप रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
चाकूर रोटरी क्लबच्यावतीने शनिवार दि.29 जून 2024 रोजी विश्वशांती धाम मंदिर सभागृहात लेक लाडकी भाग्याची या अभियानाचा समारोप रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.तसेच याच कार्यक्रमात प्रोजेक्ट सक्षम अंतर्गत तालुक्यातील दोन शाळेला मान्यवरांच्या हस्ते क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष कपिल माकणे,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार ,रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे ,ट्रेनर डॉ. संजय स्वामी, प्रोजेक्ट सक्षमचे डायरेक्टर नंजय चिताडे,लेक लाडकी भाग्याची अभियानाचे डायरेक्टर ॲड.युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी रोटरी क्लबचे सदस्य सुरेश हाके, शैलेश पाटील ,सागर रेचवाडे, दिलीप शेटे ,डॉ. केदार पाटील, प्रशांत शेटे ,संगमेश्वर जनगावे ,अ.ना.शिंदे, जगत जागृती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व वटसिद्ध नागनाथ आश्रम शाळा वडवळ नागनाथ येथील शिक्षक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी केले . सूत्रसंचालन सुरेश हाके यांनी तर आभार प्रदर्शन क्लबचे ट्रेनर डॉ. संजय स्वामी यांनी केले .


