परभणीतील दलित वस्तीमधील युवकांचे कोबिंग ऑपरेशन थांबविण्याची व्ही. एस.पँथर्सची मागणी

चाकूर : 12 डिसेंबर /मधुकर कांबळे
परभणी येथील संविधान विटंबना घटनेनंतर पोलीस दलित वस्तीमध्ये जाऊन कोबिंग ऑपरेशन करून युवकांना पोलिस ठाण्यात घेऊन जाऊन खोटे गुन्हे दाखल करत आहेत हे त्वरित थांबवावे अन्यथा व्ही. एस.पँथर्सच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन व्ही.एस.पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके व प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांच्या सूचनेनुसार राज्याचे मुख्यमंत्री यांच्यानावे व्ही. एस.पँथर्स जिल्हा शाखेच्यावतीने चाकूरचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, तालुकाध्यक्ष अजय वाघमारे ,रवी वाघमारे, गजानन कांबळे, कुलदीप कांबळे, समाधान गायकवाड, मयूर कांबळे, प्रतिपाल गवळे शेषराव कांबळे, प्रतीक कांबळे, सुशांत गायकवाड, दयानंद कांबळे, विकास कांबळे ,आदित्य कांबळे, पृथ्वीराज कांबळे ,अनिकेत बेडे,रजत भोळे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


