सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील सहकार विभागाचा आढावा

चाकूर : 5 जानेवारी /मधुकर कांबळे
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सहकार विभागाचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी सहकार विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून काही सूचना केल्या.
आज रविवार दि.5 जानेवारी रोजी सहकार मंत्री पाटील हे विविध कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सहकार विभागाची आढावा बैठक घेतली . यावेळी त्यांचा सहकार विभागाच्या वतीने सहकारमंत्री पद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीस सोलापूरचे विभागीय सह निबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके, विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे , राजेन्द्र शिंदे, उमेश पवार, दत्तात्रय भवर, अमर झालटे, प्रकाश नालवर, राहुल ठोंबरे, मोहन शिंदे, अनिकेत शिंदे यांच्या सह सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते.


