आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार आणि लोकप्रतिनिधिंनी हातात हात घालून काम करावे – ना.बाबासाहेब पाटील

ना. पाटील यांच्याहस्ते डोंग्रजकर, शशिकांत पाटील, नरसिंह घोणे, संजीव पाटील यांचा पुरस्काराने सन्मान

चाकूर : 12 जानेवारी / मधुकर कांबळे
समाजाच्या विकासासाठी पत्रकार आणि लोकप्रतिनिधिंनी हातात हात घालून काम करणे अतिशय महत्वाचे असून यासाठी दोघांनीही सकारात्मक दृष्टीकोण बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर येथे सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील विविध पुरस्काराचे वितरण राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते रविवार,दि. 12 जानेवारी रोजी येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती विभागाचे विभागीय सहाय्यक संचालक डॉ.श्याम टरके होते.याप्रसंगी सत्कारमूर्ती तथा पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मातोश्री कमलनी अमृतराव डोंग्रजकर,कन्या शर्वरी मंगेशराव देशपांडे, टाईम्स नाऊ मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील ,दैनिक मराठवाडा केसरी सह अनेक दैनिकांचे समुह संपादक नरसिंह घोणे आणि दैनिक गावकरीचे जिल्हा प्रतिनिधी संजीव पाटील हे मान्यंवर उपस्थित होते.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सर्व सत्कारमूर्तीचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सर्व उपस्थितांचा सिटी प्रेस क्लबच्यावतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद, जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर,नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे , राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी,बाळू लाटे,गणपत कवठे,काँग्रेस शहराध्यक्ष हुसेन शेख,व्ही. एस. पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किणीकर,ज्ञानेश्वर चाकूरकर,ॲड. संतोष गंभीरे, ॲड. संतोष माने,ॲड. श्रीधर सोनटक्के,विश्वनाथ एडके, विष्णू तिकटे, मोहन कुलकर्णी,सतीश फुलारी,पत्रकार प्रशांत शेटे, संग्राम वाघमारे,सुधाकर हेमनर,संजय पाटील,गणेश स्वामी, अलीम शेख, पांडुरंग साळुंके,अजगर मचकूरी, हाकाणी सौदागर,संदीप शेटे,युनूस सय्यद, तौफिक शेख,अजित सौदागर, मतीन गुळवे,चंद्रमणी सिरसाठ जाफर सय्यद,शिवाजी शिंदे,सचिन तोरे,आशिष शिंदे यांच्यासह चाकूर तालूक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश तगडपल्लेवार यांनी केले.या प्रसंगी सिटी प्रेस क्लब चाकूरचे अध्यक्ष प्रा.अ. ना. शिंदे यांनी प्रास्तावीक मनोगत व्यक्त केले.सचिव मधुकर कांबळे यांनी उपस्थिंताचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमेश्वर जनगावे,सतिश गाडेकर,सलीम तांबोळी, चेतन होळदांडगे,सुनील भोसले,ॲड. बसवेश्वर जनगावे, उद्धव दुवे,विजय शिंदे,सुशील वाघमारे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??