पत्रकार वाघमारे,पाटील व टाक मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कारांने सन्मानित
खा. काळगे व आ. बनसोडे यांच्या हस्ते उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

चाकूर : 25 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने चाकूर येथील पत्रकार संग्राम वाघमारे यांना शोध वार्ता गटातील तर संजय पाटील व शिवशंकर टाक यांना उत्कृष्ट गटातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्काराचे वितरण लातूरचे खा. डॉ.शिवाजी काळगे व माजीमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विभागीय माहिती सहाय्यक संचालक डॉ. श्याम टरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून मराठवाडास्तरीय शोध वार्ता व उत्कृष्ठ वार्ता या दोन गटात पुरस्कार दिले जातात.यंदा शोधवार्ता गटात संग्राम वाघमारे यांच्या चाकूर तालुक्यातील 27 जि.प. शाळांचे भवितव्य धोक्यात या बातमीस द्वितीय पुरस्कार तर उत्कृष्ट वार्ता गटातून चाकूर येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी संजय पाटील यांच्या आईच्या प्रेमापोटी तीन मुलांनी बांधले मंदिर या बातमीस प्रथम व वडवळ नागनाथ येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी शिवशंकर टाक यांच्या गाव हागणदारी मुक्त होइना, हातातले टमरेल काही जाईना या बातमीस तृतीय पुरस्कार मिळाले.सदरील पुरस्काराचे वितरण शनिवार दि.22 फेब्रुवारी रोजी उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्रालयाच्या सभागृहात करण्यात आले.

यावेळी उदगीर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष एल. पी. उगिले,राजकुमार मोगले,प्रा.प्रवीण जाहुरे,प्रा. वसंत गोखले,बालाजी कवठेकर,रवींद्र हसरगुंडे,पांडुरंग साळुंके, दीपक पाटील यांच्यासह उदगीर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


