आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न ,विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणीना उजाळा

चाकूर : 4 जून / मधुकर कांबळे
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात शनिवार दि.1 जून 2024 रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला असून यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला.

भाई किशनराव देशमुख महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई देशमुख होत्या. यावेळी मंचावर संस्थेचे सचिव ॲड. प्रल्हादराव कदम ,सहसचिव बाबासाहेब देशमुख ,राम जाधव,महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मेळाव्याचे मुख्य संयोजक डॉ. सर्जेराव शिंदे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे, सचिव सिद्धेश्वर पवार, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळे, कोषाध्यक्ष मधुकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, वकील, व्यवसाय, पत्रकारिता, प्रशासकीय सेवा,याबरोबर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक , अध्यात्म,कला,शेती, एन.जी. ओ.,कॉन्ट्रॅक्टर, बँक आदी इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांशी विचारविनिमय करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्नेह मेळावा दिवसभर दोन सत्रात घेण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या महाविद्यालयीन जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच महाविद्यालयाबद्दल कृतघ्नता व्यक्त केली. या मेळाव्यास जवळपास दोनशेच्यावर माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सीमाताई देशमुख, ॲड. प्रल्हादराव कदम,बाबासाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले . मधुकर कांबळे यांनी माजी विद्यार्थी संघाची माहिती व कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.तर नगरसेवक इम्रान सय्यद,प्राचार्य डॉ. सदानंद गोणे,प्रा. यज्ञजिता भुरे बडुरे, नुरजहाँ शेख,ॲड. भिमाशंकर नंदागवळे,विलास मालिशे,निशिकांत मिरकले,प्रा. डॉ. परमेश्वर सूर्यवंशी,प्रा. डॉ. श्रीराम भालेराव,रमेश गिरके,सतीश पांचाळ,प्रा. अशोक चित्ते,प्रा. विशाल हौसे,निलेश महाराज चव्हाण,तानाजी गौंड,डॉ. श्रद्धा पाटील,सुशिल वाघमारे,मुकुंद बिराजदार,प्रा. डॉ.संजय कांबळे,बबिता तिवघाळे,चंद्रशेखर मुळे,चंद्रकांत मोठेराव,श्रीराम बांगड,महेश चेऊलवार आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.
सकाळी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात आगमन होताच महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश तगडपल्लेवर व प्रा. राजेश विभुते यांनी केले.
महाविद्यालायतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आरओ फिल्टर भेट देण्यात आले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्यासह माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळे,सचिव सिद्धेश्वर पवार, कोषाध्यक्ष मधुकर कांबळे,सहसचिव ज्ञानोबा येमले,सदस्य प्रा.स्वाती नागराळे,प्रा. मल्हारी जक्कलवाड,प्रा. राजेश विभुते,डॉ. राजेश तगडपल्लेवर, डॉ.जनार्धन वाघमारे, डॉ. रमेश साळी,डॉ.प्रकर्ष देशमुख,डॉ. संभाजी जाधव, डॉ. श्याम जाधव,डॉ.शिवानंद गिरी,डॉ. भानुदास पवार, डॉ.भारत लासुरे,डॉ. दत्ता वाघुले, डॉ. मगदूम बिदरे,डॉ. नागोराव आसोले, डॉ. अशोक पुदाले,डॉ. राजकुमार जाधव,डॉ. नामदेव गोंड,प्रा. व्यंकटेश माने,बबिता मानखेडकर, प्रा.मंगल माळवदकर, प्रा. बाळासाहेब बचाटे,प्रा. दीपक बुकटे,महादेव स्वामी, बाळू जाधव,अशपाक शेख,सिद्धेश्वर स्वामी,एकनाथ भोसले, हिरामण राठोड,दत्तात्रय कोकरे,बापूराव नागपुरे यांनी परिश्रम घेतले.
सेल्फी पॉईंट ठरला विद्यार्थी फोटो कट्टा
==========================
या मेळाव्याच्या निमित्ताने संयोजकांनी विदयार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे नाव, वेलकम व माझं कॉलेज अशा सेल्फी पॉईंटची खास व्यवस्था केली होती. या सेल्फी पॉईंटवर आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी स्वतःचा फोटो तर काढलाच. त्याचबरोबर आपल्या मित्रासोबत व गुरुजनसोबत फोटो घेतल्याने हा सेल्फी पॉईंट दिवसभरासाठी फोटो कट्टा गजबजून गेलेला पहावायस मिळाला.
तसेच याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सिने कला दिग्दर्शक सतीश पांचाळ यांनी स्वतःच्या कलात्मक अक्षरात भेट – तुमची आमची या मथळ्याच्या या रेखीव व देखीव फलकाजवळही अनेकांना आपल्या मित्र मैत्रणीसॊबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. याही ठिकाणी फोटोसाठी मोठी गर्दी पहावायस मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??