श्री जनमाता आई देवस्थानासाठी भरीव निधी देणार – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील
श्री जनमाता आई मंदिरात रूढी,प्रथा,परंपरा,रितीरिवाजानुसार घटस्थापना

चाकूर : 21 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
श्री जनमाता आई देवस्थानसाठी भरीव निधी देऊन मंदिराचा विकास घडवून आणणार असून विकास कामातून मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथे केले . 
चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील नवसाला पावणाऱ्या श्री जनमाता आई मंदिरात राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना सहकार मंत्री ना. पाटील म्हणाले की .श्री.जनमाता आई मंदिराचे महत्व अनादी कालापासून आहे. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. महाराष्ट्र राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम पाहत असलो तरी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी व आर्थिक उन्नतीसाठी मी देवीकडे प्रार्थना करत आहे असेही सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील म्हणाले.
हाळी खुर्द येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम रूढी,प्रथा,परंपरा,रितीरिवाजानुसार रविवार दि.21 सप्टेंबर 2025 रोजी कलश यात्रा, छबिना मिरवणूक, आराधी, वाजंत्री यांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालखीतून देवीची गावामध्ये छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात व देवीची विधिवत पूजा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील व भाजप नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आली.
पालखी मिरवणुकीचे स्वागत व पूजन गावात अनेक ठिकाणी करण्यात आले. समारोप माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, चाकूरचे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, शिवलिंग स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. चंद्रकांत साळुंके या दांपत्याच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
या सोहळ्यास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे,सरपंच प्रचिता भोसले, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, विकास गाढवे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष गंभीरे पाटील , ॲड. श्रीनाथ सावंत,माजी उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,गंगाधरअप्पा अक्कानवरू, शिवप्रसाद शेटे, संदीप शेटे, विवेकानंद शिंदे,आदित्य लवटे,सचिन तोरे,चंद्रमणी सिरसाठ,सिद्धलिंग महाराज मठ लखनगावचे मठाधिपती आबा महाराज गिरी, मोहन महाराज साळुंके, चेअरमन जलील पटेल, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बालाजी भोसले, पोलीस पाटील साहेबराव पाटील, माजी सरपंच अशोक कर्डिले, माजी उपसरपंच बब्रुवान भोसले, ग्रामपंचायत सदस्य बाबुभाई दिवाणजी, काशीम पटेल, ओमप्रकाश रेड्डी, यशवंत कर्डिले,यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भाविक भक्त, मानकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त मंडळाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्री जनमाता आई देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद जाधव, सचिव ज्ञानोबा जाधव, कोषाध्यक्ष संगमेश्वर जनगावे, विश्वस्त शुक्राचार्य नरहरे, मधुकर नरहरे, विजयकुमार भोसले, पांडुरंग शिंदे, जगदीश भोसले, अनिल रेड्डी, अविनाश शिंदे, शशिकांत शिंदे, अमर पाटील, हावगीराज जनगावे, सिद्धेश्वर चामले, भागवत चामले, संकेत भोसले यांनी पुढाकार घेतला.


