शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नंदकुमार पवार यांच्यासह असंख्य शिवसैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश .

चाकूर : 26 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नंदकुमार पवार यांनी असंख्य शिवसैनिकासोबत राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला आहे.
गुरुवार दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नंदकुमार पवार यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून यावेळी त्यांच्यासमवेत त्र्यंबक बडे, नागनाथ शिंदे, अशोक बडे, त्र्यंबक बिडवे, मारोती शिंदे, वसंत शिंदे, सिताराम लोंढे, बालाजी गौंडगावे, तानाजी बिडवे, दिलीप मतलाकट्टे, तुकाराम बिडवे, निळकंठ बिडवे, तुकाराम मतलाकट्टे, धनराज दामावले, समिंदर दामावले, रविकुमार दामावले, आकाश बिडवे, सूर्यकांत मरेवाड, प्रताप मतलाकट्टे, शिवाजी मतलाकट्टे, सचिन मतलाकट्टे, शिवाजी शिंदे, श्रीराम शिंदे, अभिमन्यू शिंदे, प्रदीप शिंदे, राजेंद्र लोंढे, योगीराज स्वामी, नागनाथ गायकवाड, मधुकर मतलाकट्टे, गजानन मतलाकट्टे, माधव शिंदे, माधव आदावले, बाबुराव कराडे, दत्ता कराडे, अमोल कांबळे, विशाल कराडे, गणपती साठे, श्रीपती पोहळे, बाबुराव पाटोळे, माधव पाटोळे, नरसिंग पाटोळे, गणेश पाटोळे, अभंग चात्रे, सोपान नलवाड, सतीश चात्रे, शंकर चात्रे, सुधाकर बद्धे, विजयकुमार नालापुरे शिवाजी चात्रे , गोविंद गौंडगावे, विजय शिंदे, शिवलिंग स्वामी, संदीप कांबळे, बळीराम गायकवाड, शेषेराम वाघमारे, रघुनाथ साठे, वैजनाथ साठे, संभाजी चात्रे, दिलीप गायकवाड, विलास चात्रे, रामेश्वर स्वामी, निळकंठ शिंदे, मारोती दामावले, सुनील दामावले, नागनाथ कांबळे, प्रल्हाद पाटोळे, नागनाथ सोनकांबळे, रामकिशन सोनकांबळे, सुरेश बद्दे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे .
मागील काही दिवसापूर्वीच वडवळ नागनाथ येथील काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीत मोठया प्रमाणात इनकमिंग होत असल्यामुळे चाकूर तालुक्यातील राजकीय समीकरने बदलली जाणार असल्याची राजकीय वर्तुळातून चर्चा ऐकावयास मिळत आहे.
ना. पाटील यांनी सर्वांचे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या पक्ष प्रवेशावेळी चाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, अनिल वाडकर,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप शेटे, यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी मानले ना. पाटील यांचे आभार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिल्याबद्दल नंदकुमार पवार यांनी सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करून आभार मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.



