प्रत्येक व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करून घ्यावी – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

चाकूर : 19 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
शरीर निरोगी राहण्यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत महत्वाची असून प्रत्येक व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वस्थ नारी, सशक्त नारी अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार मंत्री ना. पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक सारडा,डॉ. बाळासाहेब जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक होळे,माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,नगरसेवक भागवत फुले,नितीन रेड्डी,आरोग्य कल्याण समिती सदस्य डॉ.एम.जी. मिर्झा,राम कसबे, नरसिंग गोलावार,पपन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की आरोग्याची काळजी घेत स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे असून स्वतः बरोबर परिसराची स्वच्छता राखली पाहिजे.शासन मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक रुग्णांना मदत करत असून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवत आहे. या सर्व शासकीय आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांनी घेतला पाहिजे.शासनाने हे शिबिर महिला सशक्त राहिली पाहिजे यासाठी आयोजित केले आहे. घरातील महिला सशक्त आणि निरोगी असेल तर कुटुंब व्यवस्थित असते असे सांगून आरोग्य विभागाने या शिबिराचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावा.असेही ना.पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधीक्षक डॉ.जितेन जैस्वाल यांनी केले.यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य शिवदर्शन स्वामी, नगरसेवक मुज्जमील सय्यद,माजी सरपंच किशन रेड्डी, माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद,माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, गणपत नितळे, अनिल वाडकर, गंगाधरअप्पा अक्कानवरू, शिवप्रसाद शेटे, विश्वनाथ एडके,रविंद्र कुलकर्णी,मधुकर मुंडे, संदीप शेटे, अजित सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला व तालुक्यातील वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
726 महिलांची तपासणी
====================
या शिबिरात तालुक्यातील 726 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.प्रियंका राठोड, डॉ.शीतल तळीखेडकर,डॉ. आर. एस.काळे, डॉ अश्फाक सय्यद, डॉ.ईशान पाठक, डॉ.शेरेकर, डॉ. चाऊस या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रग्णांची तपासणी केली


