सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत वडवळचे सरपंच, उपसरपंच,चेअरमनसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेसला मोठे खिंडार

चाकूर : 18 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतवडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.त्यामुळे चाकूर तालुक्यात काँग्रेस पार्टीला मोठे खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिरूर ताजबंद येथील इंद्रायणीवर गुरुवार दि.18 सप्टेंबर 2025 रोजी चाकूर तालुक्यातील वडवळ (नाग.)येथील सरपंच मुरली सोनकांबळे,उपसरपंच बालाजी गंदगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन तथा चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत आचवले, ग्रामपंचायत सदस्य महादेव सूर्यवंशी, रामलिंग बनवस्कर, बाबू भोजने, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन हनमंत लवटे,अजमद पटेल,मस्जिद कमिटी सदस्य सिकंदर पटेल, सलीम उस्ताद, नजीर मुंजेवार, शिवराज आचवले, महादेव भेटे,शिवरुद्र नंदागवळे, जमीर पटेल, वाजीद पटेल, वाजीद पठाण,अख्तर पटेल,रामेश्वर नंदागवळे, अवधूत खडके, सुरेश खडके, महादेव खडके, गणेश नंदागवळे, वैजनाथ सराफ, राजू फुलारी,सुनील जनगावे,अनिल जनगावे, लक्ष्मण येवंदगे, रमाकांत स्वामी, उमाकांत बिरकीळे, लक्ष्मण पांडे,वैजनाथ लिंबुटे,पद्माकर लिंबुटे,राजकुमार देवकत्ते,लक्ष्मण बेरकिळे,रमाकांत नवणे,लक्ष्मण मोहनाळे, राजकुमार मोहनाळे,उमेद शेख,अब्दुल शेख, बबर शेख,रघुनाथ मस्के, बळीराम सोरटे, नितीन कसबे, सरफराज खूरेशी, इकबाल खूरेशी, बालाजी गजाकोश, रहेमान शेख, लाला शेख,कमलाकर वाघमारे, बाबुराव भोजने, वसंत नवणे,अनिल जनगावे, दिगंबर वाघमारे,भगवान सोरटे,अशोक सोरटे,नागनाथ कांबळे,श्याम चव्हाण,संगम कसबे, वैजनाथ बरले,पापा फुलारी, भीमाशंकर नंदागवळे,सोमनाथ कुंभार, सचिन कसबे, सिद्धेश्वर जाधव, विश्वनाथ गजाकोश,रमाकांत नवणे,बालाजी भोजने या प्रमुखांसह आदीनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत व अभिनंदन सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, अनिल वाडकर, गणपत कवठे,युवक तालुकाध्यक्ष संदीप शेटे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष आदित्य लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर वडवळ (नाग.)येथील काँग्रेसच्या मात्तब्बर मंडळींनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे या भागातील राजकीय समीकरणे बदलली जाणार अशी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


