चाकूरात रविवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त शर्करा (ब्लड शुगर )तपासणी शिबिर
जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घेण्याचे शिबीर संयोजन समितीचे आवाहन

चाकूर : 5 जुलै / मधुकर कांबळे
धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर यांच्या वतीने चाकूर येथील जगत जागृती विद्यालयात रविवार दि. 7 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नि:शुल्क मोतीबिंदू व रक्त शर्करा(ब्लड शुगर) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिबिराचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या शिबिराचे उदघाटन अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील राहणार आहेत. तसेच बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूरचे सदस्य साहेबराव जाधव यांच्यासह राजकीय,सामाजिक,आरोग्य,शैक्षणिक,सहकार आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर व तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये वातविकार,संधिवात,आमवात,आम्लपित्त,मधुमेह,त्वचा विकार,कान-नाक-घसा,हृदयरोग,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी,स्तन व गर्भाशयाचे आजार,मानसिक आजार,कर्करोग,अस्थिरोग,यकृताचे विकार,वंध्यत्व व लैंगिक समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर तज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार असून रुग्णाना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शिबिरामध्ये लॉयन्स नेत्र रुग्णालय,उदगीर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी करून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींवर अल्प दरात औषधोपचार व शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहेत.लातूर,उदगीर व अहमदपूर या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा बजावणारे अलोपॅथी,आयुर्वेद,डेन्टल,होमिओपॅथी व युनानी या चिकित्सा पद्धतीचे अनुभवसंपन्न व विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्स शिबिरामध्ये रुग्ण सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत.
तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर चे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील ,सर्व डॉक्टर्स व शिक्षकेत्तर,रुग्णालयीन कर्मचारी तथा सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त शर्करा (ब्लड शुगर )तपासणी शिबीर संयोजन समिती यांनी केले आहे.
शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिलांची मोफत (नि:शुल्क)कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली जाईल. आणि प्रसुती (बाळंतपण) व गर्भाशयासंबंधीत विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडिक्स,हर्निया,हायड्रोसिल,मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया (50% सवलत) अशा अल्पदरात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे केली जाणार आहे.


