एखादे विकास काम थांबवू पण शेतकऱ्यांना सर्वोत्तोपरी मदत करू- सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील

चाकूर : 28 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे एखादे विकास काम थांबवू पण शेतकऱ्यांना भरीव अशी सर्वोत्तोपरी मदत करू अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी दिली.
नवरात्र उत्सवानिमित्त रोहिणा येथील अंबिका देवीच्या दर्शनासाठी ना. पाटील आले असता ते ग्रामस्थांशी सवांद साधताना बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे,चाकूरचे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे,अनिल वाडकर,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गणपत नितळे, शिवाजी हुडे, भालचंद्र चाटे, गणपत कवठे, सिद्धेश्वर अंकलकोटे, , मधुकर मुंडे, निलेश भंडे, भागवत कुसंगे, सुनील चिंताले, अरविंद केंद्रे, युवराज हाके, संदीप शेटे, विठ्ठल डोंगरे, मच्छिंद्र नागरगोजे, बजरंग केंद्रे, भुजंग केंद्रे, शामराव केंद्रे, अजय घोरपडे, ओम केंद्रे, समाधान डोंगरे, पंकज केंद्रे, शुभम घुमे, राजू शिंदे यांच्यासह ग्रामस्थ,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, पहिल्यांदाच एवढी मोठी निसर्गाची अवकृपा पाहत असून .या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.यासाठी शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सहकार मंत्री ना. पाटील म्हणाले


