कबनसांगवी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

चाकूर: 25 मे /मधूकर कांबळे
माहे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत कबनसांगवी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी महाविद्यालयाने कायम राखली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कबनसांगवी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 73 विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्यात विषेश प्राविण्यात एक,प्रथम श्रेणी 52 तर व्दितीय श्रेणीत 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेचाही शंभर टक्के निकाल लागला असून कला शाखेतून 30 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात प्रथम श्रेणी 10, द्वितीय श्रेणीत 18, उत्तीर्ण श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेतून गुणानुकमे दिव्या सातानुरे हिने 76.83 % गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.शर्वरी मुंगडे हिने 72.67 % घेऊन द्वितीय आली आहे तर अंजली साळूंके 72 % गुण घेऊन तृतीय आली आहे.

कला शाखेतून सुरज कसबे (प्रथम), प्रणव सांगवे (द्वितीय),तर अनिकेश फरकांडे ( तृतीय ) आले आहेत.
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, सचिव. दलित मित्र, शिक्षण महर्षी डि.बी. लोहारे , सहसचिव डॉ. सुनिता चवळे, प्राचार्य गंपले, प्रा. अंगद बोबडे , प्रा. अरूण खसे, प्रा. श्रीमती उषा सरवदे, प्रा. अर्चना इंचुरे , प्रा.पी.एन बिरादार, प्रा . संजय बिरादार, प्रा.गजानन वाडकर, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


