वडवळ नागनाथ सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी संभाजी रेकुळगे यांची बिनविरोध निवड

चाकूर : 15 सप्टेंबर /मधुकर कांबळे
तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा जेष्ठ संचालक संभाजी वैजनाथप्पा रेकुळगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
येथील सेवा सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. सोसायटीच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत आचवले यांच्या उपस्थितीत नुकतीच सोसायटीच्या सभागृहात सर्व संचालकांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक संभाजी रेकुळगे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नूतन उपाध्यक्ष रेकुळगे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ संचालक तथा माजी उपाध्यक्ष हणमंतराव पाटील, आजमत पटेल, संचालक वैजनाथप्पा नंदागवळे, शशिकांत चिंतलवार, संतराम वाघमारे, बाबु भोजने, अशोक बेंडके, संस्थेचे गटसचिव आर.आर.कुसनुरे, लिपिक रामकिसन केंद्रे उपस्थितीत होते.
या निवडीबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच बालाजी गंदगे यांच्या हस्ते रेकुळगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रीराम मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश निटुरे, पत्रकार मित्रमंडळाचे भरतसिंह ठाकूर, संतोष आचवले, शिवशंकर टाक, राजकुमार मोहनाळे, मोरया गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनेही विविध ठिकाणी रेकुळगे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्कारला उत्तर देताना रेकुळगे यांनी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.


