आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा उपक्रमांतर्गत नागेशवाडी येथील बापू विद्यालय चाकूर तालुक्यात प्रथम

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

चाकूर : 29 सप्टेंबर /मधुकर कांबळे
मुख्यमंत्री माझी शाळा -सुंदर शाळा टप्पा क्रमांक – 2 या अभियानात नागेशवाडी येथील बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने चाकूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला असून याबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेले शैक्षणिक संकुल म्हणून बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे नागेशवाडी पंचक्रोशीत एक नावाजलेले शैक्षणिक संकुल म्हणून ओळखले जात असून या संकुलनाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात चाकूर तालुक्यात प्रथम येण्याचा मान या विद्यालयाने मिळवला आहे.यासाठी संस्थेचे सचिव देविदास नादरगे, प्राचार्य महादेव मद्ये व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यां यांचे योगदान आहे.
बापू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील 31 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळालेली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतही या विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा राखली असून या विद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
तालुकास्तरीय आलेल्या मूल्यांकन समितीने इमारतीसह, शालेय परिसरातील वृक्ष लागवड , परसबाग बॉटनिकल गार्डन , वर्ग सजावट , रंगरंगोटी , स्वच्छता ,शाळेचे क्रीडांगण, शालेय परिसर , स्वच्छता मॉनिटर, महावाचन उत्सव उपक्रम , नवसाक्षरता अभियान , सुसज्ज ग्रंथालय , क्रीडा विभाग तसेच कार्यालय आणि शिक्षक कक्ष अशा अनेक बाबींसह भौतिक सुविधा , विद्यार्थी गुणवत्ता इत्यादीचे मूल्यांकन समितीने केले.आणि त्यातून चाकूर तालुक्यात प्रथम येण्याचा मान विद्यालयाने मिळविला आहे.याबद्दल मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्थेचे सचिव देविदास नादरगे,राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे,आदर्श शिक्षक सुर्यकांत पांचाळ,राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ,संस्थेचे संचालक भरत नादरगे, नागेशवाडी,गोविंदवाडी, रोहिण्याचे सरपंच, नागरिक,उजळंब ,मांडुरकी, माहुरवाडी, रामवाडी या गावातील पालक व गावकऱ्यांनी याबद्दल अभिनंदन केले आहे .
या अभियानात मुख्याध्यापक महादेव मद्ये , प्रा. ज्ञानेश्वर चामे, प्रा. सूर्यकांत गायकवाड, प्रा. बालाजी नलाबले , सूर्यकांत मुंडे , प्रा. बाबुराव हेळगे,सूर्यकांत गव्हाणे , श्री धर्मेंद्र बोडके , प्रा. गजानन पाटील , श्री संदिप कासले, श्री रवी झांबरे , प्रा. अमोल राठोड , श्रीमती अनिता तेलंग मॅडम, देवर्षे बबिता मॅडम, कांचन देशमुख मॅडम ,श्री पुंडलीक फफागिरे ‘ श्री इंद्राळे ज्ञानोबा , श्री सुभाष चामलेवाड , श्री गोपाळ कोकरे इत्यादीने परिश्रम घेतले .

मूल्यांकन समितीत चाकूरचे गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपूरे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय आलमले,विषय साधन व्यक्ती सतिश जाधव,प्रकाश भालके व रवि चिमणदरे यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??