मुलानी केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू, आरोपी मुलगा अटकेत

चाकूर : 16 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
परीक्षेची फीस भरण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात व शरीरावर काठीने मारहाण केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाकूर तालुक्यातील हिंप्पळनेर येथे घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाकूर तालुक्यातील हिंप्पळनेर येथे सोमवार दि.15 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते मंगळवार दि.16 सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान देविदास काशिनाथ पांचाळ (वय वर्ष ७०) यांना त्यांच्याच अजय देविदास पांचाळ या 24 वर्षाच्या मुलाने परीक्षेची फीस भरण्याकरीता पैसे न देता गॅस भरुन घेतल्याचा मनात राग धरून हातातील लाकडाने डोक्यात,शरीरावर, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर व इतर ठिकाणी मारले.त्यात देविदास पांचाळ यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी हिंप्पळनेर येथे जाऊन घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आणला.
मयताची पत्नी शारदाबाई देविदास पांचाळ(वय 50 वर्ष)यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय देविदास पांचाळ या मारेकरी मुलाला ताब्यात घेतले असून त्यास अटक करण्यात आली आहे.आरोपी मुलगा अजय पांचाळ याच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं.495/2025 कलम 103(1)118(1)115(2)बी. एन. एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले हे करीत आहेत.चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत देण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर व पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन पहाणी केली. तसेच लातूर येथील फॉरेन्सिकच्या टिमनेही हिंप्पळनेर येथे जाऊन घटनास्थळाची पहाणी केली आहे .


