बारावी परीक्षेत भाई किशनराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालाच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम
कला शाखेतून श्वेता कंदरफळे, वाणिज्य शाखेतून नेहा सोनटक्के, विज्ञान शाखेतून सोहम जोशी तर किमान कौशल्य विभागातून इंद्रजीत पवार प्रथम

चाकूर : 21 मे / मधुकर कांबळे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवार दि.21 मे रोजी जाहीर झाला असून याहीवर्षी भाई किशनराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेतून श्वेता बब्रुवान कंदरफळे, वाणिज्य शाखेतून नेहा विश्वनाथ सोनटक्के, विज्ञान शाखेतून सोहम माधव जोशी तर किमान कौशल्य विभागातून इंद्रजीत बळीराम पवार या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
कला शाखेचा 96.36 टक्के लागला असून प्रथम – श्वेता बब्रुवान कंदरफळे 86.17%,द्वितीय – राधा सुभाष राजगीर 78.30 %, तृतीय – सुनिता वामन भोसले 77.67 %
वाणिज्य शाखेचा 98.50 टक्के निकाल लागला असून प्रथम – नेहा विश्वनाथ सोनटक्के 83.17%,द्वितीय – शंतनू दयानंद लांडगे 81.50%,तृतीय – शिवकन्या प्रमोद करवंदे 80.50%
विज्ञान शाखेचा निकाल 98.57 टक्के लागला असून प्रथम- सोहम माधव जोशी 83.50%,द्वितीय – वैभवी सुब्रमण्यम स्वामी 79.50%,तृतीय – अंकिता गंगाधर पाटील 76.67%
किमान कौशल्य विभागाचा 100 % निकाल लागला आहे.यात प्रथम -इंद्रजीत बळीराम पवार इलेक्ट्रिकल,द्वितीय -सादिया मुबारक शेख (मार्केटिंग अँड सेल्समन शिप)

विशेष म्हणजे मनीषा मारुती सुरडे व आरती भरत पांचाळ या दोन विद्यार्थिनींनी शिक्षण शास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.
कला शाखेत विशेष प्राविण्यात 4 तर प्रथम श्रेणीत 24 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत विशेष प्राविण्यात 10 तर प्रथम श्रेणी 24 तर विज्ञान शाखेत विशेष प्राविण्यात 3 तर प्रथम श्रेणीत 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणाऱ्या मार्गदर्शक प्राध्यापकांचे लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख,सचिव ॲड.पी.डी. कदम, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख,सहसचिव बाबासाहेब देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे,पर्यवेक्षक प्रा.बाळासाहेब बचाटे यांनी अभिनंदन केले.


