बारावी परीक्षेत सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

चाकूर : 22 मे / मधुकर कांबळे
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या 12 बोर्ड परिक्षेत चाकूर तालुक्यातील झरी बु येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातून आयशा मुजावर 85%गुण घेऊन प्रथम आली असून समिर शेख याने 79% आणि मधुरा रेवाणकर हिने 78% गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. परीक्षेला एकुण 28 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 25 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 6 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा 90 टक्के निकाल लागला आहे.
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे चंचल भारती विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील,सचिव विक्रमसिंह दोडके , प्राचार्य गिरीधर कणसे, माजी प्राचार्या रसिका देशपांडे,एन.पी.कानवटे,सरपंच सुरेखा सुरवसे ,माजी सरपंच अजित खंदारे प्रा.वैजनाथ सुरनर,प्रा.मारोती बुद्रुक, प्रा.दयानंद झांबरे,शिक्षक , पालक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अभिनंदन करून पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या आहेत.


