आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री साई नॅशनल इंग्लिश स्कूलचे स्वप्नतरंग स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चिमुकल्या बाल कलाकाराच्या कलाविष्काराने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

चाकूर : 25 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
येथील श्री साई नशनल इंग्लिश स्कूलचे स्वप्नतरंग वार्षिक स्नेहसंमेलन अंत्यत उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाले.चिमुकल्या बाल कलाकाराच्या कलाविष्काराने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य शिवाजीराव नवरखेले यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्रीधर सोनटक्के हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय नरळे, पोलिस उपनिरीक्षक कपिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे,अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापुरे, रोटरीचे क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांता स्वामी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शालिका पाटील, अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, संस्थेच्या सदस्या गोदावरी सोनटक्के, ओमशांती केंद्राच्या प्रमुख ज्योती बहेनजी यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेच्या चिमुकल्या बाल कलाकारांनी वेलकम सॉंग, देवा श्री गणेशा, ओ माय फ्रेंड गणेशा, नन्हा मुन्ना राही हूं, संदेशे आते है,चुडी जो खनके हाथो मे, हम होंगे कामयाबब, चंद्रा (लावणी ),मी हाय कोळी( कोळी नृत्य), मैं निकला गडी लेके, स्कूल चले हम, सुनो गौरसे दुनियावालो,गाडीवाला आया घर से कचरा निकाल(स्वच्छता संदेश), चला जेजुरीला जाऊ, शिवनेरीवर शिवबा जन्मले, जय हो, हुंडा नको मामा मला, टुकूर टुकूर,बम बम भोले, माँ ओ मेरी माँ,चौनाडा तारा (टिपरी नृत्य ), बोले चुडियाँ भारत का बच्चा बच्चा या मराठी व हिंदी गाण्यावर आपला कलाविष्कार सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता जोशी यांनी केले.सुत्रसंचालन ईश्वर स्वामी व मारूती हुडगे यांनी तर आभार संस्थेच्या सचिव संगिता सोनटक्के यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक संकेत सोनटक्के, माधुरी हुडगे, रोहिणी गांजुरे, प्रियंका मुंडे, शितल कदम यांनी परीश्रम घेतले.या कार्यक्रमास पालक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??