चाकूरात मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिर संपन्न, शिबिरात 2459 रुग्णाची केली तज्ञ डॉक्टर्सनी तपासणी

चाकूर : 11 जुलै /मधुकर कांबळे
धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर यांच्या वतीने चाकूरच्या जगत जागृती विद्यालयात मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा निःशुल्क मोतीबिंदू व रक्त शर्करा (ब्लड शुगर) तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि.7 जुलै 2024 रोजी करण्यात आले होते .या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून दोन हजार 459 रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली.

माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिराचे उदघाटन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील चाकूरकर होते.

या उदघाटन कार्यक्रमास डॉ. रमेश भराटे, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य साहेबराव जाधव,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पद्माकरराव पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती करीमसाहेब गुळवे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे,काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल माकणे, उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे, पाणीपुरवठा सभापती भागवत फुले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,बाजार समितीचे संचालक तथा युवक तालुकाध्यक्ष राहुल सूरवसे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सुर्यवंशी,औदयोगिक वसाहतीचे चेरममन करीमसाब डोंगरे,भानुदास पोटे,गंगाधरअप्पा अक्कानवरू,गणपत कवठे,नागोराव पाटील, शिवप्रसाद शेटे, अर्जुन मद्रेवार,नगरसेवक नितीन रेड्डी,मुज्जमील सय्यद, इलियास सय्यद, गटनेत्या हिरकनबाई लाटे,नगरसेविका ज्योती स्वामी, गंगुबाई गोलावर, शुभांगी कसबे, महिला तालुकाध्यक्षा शकुंतला शेवाळे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे,तालुकाध्यक्ष अध्यक्ष विश्वनाथ एडके,सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष नूर पटेल,राम कसबे पपन कांबळे,महंमद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात वातविकार, संधिवात, आमवात, आम्लपित्त, मधुमेह, त्वचा विकार, कान-नाक-घसा चे आजार,हृदयरोग, पोटाचे विकार, लहान बालकांचे आजार व स्त्रीयांचे विकार- मासिकपाळी, स्तन व गर्भाशयाचे आजार, मानसिक आजार, कर्करोग, अस्थिरोग, यकृताचे विकार, वंध्यत्व व लैंगिक समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णाची तपासणी करून मोफत औषध देण्यात आले.तसेच 536 रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली.शिबिरातील रुग्णाची तपासणी लातूर, उदगीर व अहमदपूर येथील डॉक्टर्सनी केली.अलोपॅथी, आयुर्वेद, डेन्टल, होमिओपॅथी व युनानी या चिकित्सा पद्धतीचे अनुभवसंपन्न व विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्स शिबिरामध्ये रुग्ण सेवेसाठी उपलब्ध झाले होते.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बिलाल पठाण यांनी केले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांच्यासह धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी व संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


