अहमदपूरात 18 सप्टेंबर रोजी सकल ओबीसी समाज मेळाव्याचे आयोजन
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाक्के व नवनाथ वाघमारे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

चाकूर : 10 सप्टेंबर / मधुकर कांबळे
अहमदपूर येथे 18 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सकाळी 11 वाजता ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाक्के व नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात चाकूर अहमदपूर तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. माधव कोळगावे व जिल्हा बँकेचे संचालक एन. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही यासाठी प्रा. हाक्के यांनी सुरु केलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी व ओबीसी समाजाचे सामाजिक संघटन वाढीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून चाकूर तालुक्यातून किमान 6 हजार ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी गंगाधर केराळे,माधव भिंगोले,अशोक चिंते,सुरेश मुंढे,मधुकर मुंढे, सुरेश हाक्के,राम खंदाडे,नामदेव मांडूरके,विष्णू डोंजे यांच्या सह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी लातूररोड येथील मधुकर मुंढे यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये सकाळी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस तालुक्यातील जवळपास 50 गावातून ओबीसी समाजाचे प्रमुख उपस्थित होते. अधिकाधिक समाज बांधवाना या मेळाव्यासाठी अहमदपूर येथे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


